Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दौंड विधानसभेत पुन्हा एकदा ‘दादा’ विरुद्ध ‘आप्पा चुरशीची लढत; तिसरा पर्याय नाही, अनेकांनी उमेदवारी घेतली माघारी

by SBPRNL
November 4, 2024
दौंड विधानसभेत पुन्हा एकदा ‘दादा’ विरुद्ध ‘आप्पा चुरशीची लढत; तिसरा पर्याय नाही, अनेकांनी उमेदवारी घेतली माघारी

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पारगांवः धनाजी ताकवणे 

दौंड तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी हायहोल्टेज लढत येथे पाहिला मिळणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या शाब्दिक चकमक सुरू होऊ लागण्याने दौंड तालुक्यातील मतदार राजा आता काय निर्णय घेतो यावर ही निवडणूक आधारलेली आहे.  विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच अनेक दिग्गजांकडून आपल्या उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आले. दौंड तालुक्यातील पारंपारिक प्रतीद्वध्वी पुन्हा आमने सामने लढतानाचे चित्र पाहिला मिळणार आहे.

दौंड तालुक्यातील तिसरा पर्याय बादशहा शेख, विरधवल जगदाळे यांनी आज दि. ४ नोव्हेंबर रोजी माघार घेतल्याने तालुक्यातील तिसऱ्या पर्यायाची आशा मावळली असून आता राहुल (दादा) आणि रमेश (आप्पा)असाच झुंझार सामना रंगणार आहे. महायुतीतील भाजपकडून राहुल कुल यांनी दौंड विधानसभेचा जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष गाव भेट दौरे सुरू करुन मतदारांपर्यंत भाजपला मतदान करुन विजयी करावे, असे आवाहन राहुल कुल यांच्याकडून करण्यात येत आहे.

अजित पवार गटातील रमेश थोरात यांनी शरद पवार गटात जाहीर प्रवेश करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. तर मागील लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटात अनेक निष्ठवंतांनी काम केले आहे, यात आप्पासाहेब पवार यांना दौंड विधानसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याचे स्पष्ट होते. परंतु ऐन विधानसभेला निष्ठवंतांना डावलून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील निष्ठवंतांच्यात अस्वस्थता पसरली असल्याचेही तालुक्याने पाहिले आहे.

तालुक्यातून रमेश थोरात यांनी आपली भूमिका मांडताना लोकसभेला आपली मोठी चूक झाली आणि शरद पवार आमचे दैवतच आहेत.  पक्षात प्रवेश मिळवत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू करून जनतेची सेवा करायची आहे, म्हणत मतदारांपर्यंत पोहचत आहेत. पारगांव येथे दि. २ नोव्हेंबर रोजी भाजपचे राहुल कुल आणि दि. ३ नोव्हेंबर रोजी शरद पवार गटाचे रमेश थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दौंड तालुक्यातील राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असाच चुरशीच हायहोल्टेज सामना रंगणार तिसरा पर्याय नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Tags: daundkoolPunerajgadnewsthorat
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post

भोर विधानसभा - मतदार जनताच ठरविणार भोरचा आमदार ? मातब्बर अपक्ष उमेदवार ; मतदान विभागणीत संग्राम थोपटेंचेच पारडे जड तालुक्यातून चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group