शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र तुकाराम सात्रस यांना नुकतेच राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे ग्रामिकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले तसेच उरळगावचे सुपुत्र राजेंद्र सात्रस यांनी गावांमध्ये विविध विकासकामे करत असताना वंचित, पीडित, गरिब, दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत गोरगरिबांना घरकुल वाटप, विधवा महिलांना पेन्शन, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
तसेच कोरोनासारख्या महामारीमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली. काही गरजूंना धान्य वाटप, आरोग्य शिबिरे, स्मशानभूमी सुशोभीकरण, वृक्षारोपण यांसह आदी विकास कामांमध्ये पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना नुकतेच राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार अभिनेत्री शिवानी नाईक, दक्ष मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, आदित्य श्रीमंदिंलकर, ॲड. सतीश कांबळे, शोभाताई बल्लाळ बाळकृष्ण नेहरूकर, संभाजी जामदार, एकनाथ कोरे यांसह आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. यावेळी त्यांना सपत्नीक हा पुरस्कार स्विकारला. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी माजी सरपंच सुरेखा सात्रस यांच्यासह सपत्नीक पुरस्कार स्विकारला असून, सात्रस यांचे पुणे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.