पुणेः दहिहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल नंबरवरुन पोलीस कंट्रोल रुममध्ये कॅाल आला आणि संबधित व्यक्तीकडून कमला नेहरु रुग्णालयाजवळ एकटा असून, ३० ते ३० लोक तलवार घेऊन फिरत असून, त्यांच्याजवळ दारुच्या बॅाटल आहेत. ते मला मारहाण करु शकतात. त्यामुळे मला पोलीस मदत मिळावी, असे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांना लागलीच घटना स्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र त्या ठिकणी तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका २२ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ अॅागस्ट रोजी दहीहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल क्रमांक वरुन १०० नंबर वर (कंट्रोल) रूमवर कॉल करुन, कळविले की, “मी कमला नेहरु हॉस्पीटल जवळ (घटनास्थळी) एकटा असून, ३० ते ४० लोक तलवार घेवुन फिरत असुन त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे मला मारहाण होऊ शकते. मला पोलीस मदत हवी आहे.” अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्ष येथे प्राप्त झाली असता सदरचा कॉल हा बीट मार्शलला देण्यात आलेला होता. सदर बीट मार्शल वरील कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता, तसा कोणताही प्रकार आढळून आला नाही त्यांनी कॉलरला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर कॉलरने त्यांचा मोबाईल क्रमांक हा बंद ठेवला असल्याचे आढळून आले.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर असताना देखील असा कॉल प्राप्त झाल्याने पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बाबत अत्यंत गांभीर्याने दखल घेवून योग्य तो तपास करण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार माहिती केली असता, एका २२ वर्षीय हा कॅाल केल्याचे तपासात निष्पन्न झाले, असल्याची माहिती पोलसांनी दिली आहे.
पुणे शहर पोलीसांकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ पोलीस मदतीसाठी असलेले फोन क्रमांक १०० व ११२ यांचा वापर अत्यंत सजगपणे, संवेदनशीलपणे करावा. विनाकारण, मजा म्हणून व त्रास देण्याच्या हेतून खोटे कॉल केल्यास त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई होवू शकते.