पुणे: बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींना हडपसरमधील मित्राच्या घरी नेत त्यांना दारु पाजून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहरात काहीशी अशाच प्रकारे मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नात्यातील तरुणाने मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीला अटक केली असून, हा तरुण त्यांच्याच नात्यातील असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या दंडावर गुंगीचे ओैषध असलेले इंजेक्शन आरोपीने दिले. यानंतर काही वेळेत मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंर आरोपीने तिची छायाचित्रे काढली. समाज माध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. तसेच संबंधित प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मी जेव्हा भेटायला बोलावेल. तेव्हा यायचे, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली होती. याबाबतची फिर्यादीमध्ये देखील पीडित मुलीच्या आईने हे संपूर्ण फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.