राजगड न्युज
भोर, ता. १८ : भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास आज पासून सुरुवात करण्यात येणार असून ही सेवा पाऊस काळात बंद असते.आठवड्यातून बुधवारी व शुक्रवारी अशी दोन दिवस ही सेवा देण्यात येणार आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही,भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातच ती सुरू होते.पाऊस काळात बंद असलेल्या लाँचची दुरुस्ती आता करण्यात आली असून आता नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत.
या सेवेचा फायदा चांदावणे, गुहिणी, खुलशी, भूतोडे, डेरे, भाइवली, मळे- सुतारवाडी, बुरूडमळा, नानावळे, सांगवी वेखो, वाघाची, गोपे, घुमवस्ती आणि कुंबळे या गावांना होणार आहे या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर यांनी दिली.