Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गोळीबार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; राजगड न्यूजच्या वार्तांकनाचा ठसा

by SBPRNL
June 5, 2025
ब्रेकिंग न्यूज: कापूरहोळ चौकात गोळीबार: आरोपी पकडण्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग, पण प्रकरण दडपल्याचा संशय

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

नसरापूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापुरहोळ गावात घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणी अखेर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजगड न्यूजच्या सातत्यपूर्ण पत्रकारितेचा लक्षणीय ठसा उमटला असून स्थानिक प्रशासनाला कारवाईस प्रवृत्त करण्यास भाग पाडले. त्यानुसार राजगड पोलिसांनी संशयित आरोपी अनुज दत्तात्रय झेंडे (वय 20, रा. दिवे, ता. पुरंदर) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 4 जून 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी झेंडे हा आपल्या बुलेट (MH 12 QL 0094) मोटारसायकलवरून कापुरहोळ चौकात मोठ्या आवाजात वर्दळ करत फिरत होता. त्यावेळी त्याने आपल्या ताब्यातील पिस्टलमधून अचानक हवेत गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ माजली. अनेक व्यापारी आपली दुकाने बंद करत असतानाच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

गोळीबार केल्यानंतर आरोपी झेंडे हा मोटारसायकलवरून नारायणपूरच्या दिशेने निघाला. मात्र, तो त्या वेळी दारूच्या नशेत होता आणि वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याचा अपघात झाला. अपघातात तो जखमी झाला असतानाच परिसरातील सजग नागरिक गणेश सुनिल लोहार आणि ऋतिक मारुती लोहार यांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले आणि राजगड पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्त केले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत छगन इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सिल्व्हर रंगाची, लाकडी मुठ असलेली अंदाजे ₹5,000 किमतीची पिस्टल जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.

घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांकडून काहीसे दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे आणि सोशल मीडियावर प्रखर प्रतिक्रिया उमटल्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण वाढत गेला. याच दरम्यान राजगड न्यूजने या घटनेचा सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेवटी प्रशासनाला कारवाई करण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
Next Post

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group