भोर: शहरापासून दोन कि मीअंतरावर असलेल्या बसरापूर गावचा नदी घाट यावर्षीही गणेश विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. या नदीघाटावर या गावासह अनेक आजूबाजूच्या गावातून परिसरातून तसेच भोलावडे ,भोर शहरातून अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात या गणेश मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन व्हावे तसेच नदी घाट परिसर कसा स्वच्छ राहील याकडे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व या गावचे स्वच्छता दूत पोलीस मित्र केशव साळुंके यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली आहे.
नदीकिनारी जागोजागी निर्माल्य कोठे टाकावे , निर्माल्य पाण्यात टाकु नका, स्वच्छता राखा, पाण्यात कचरा टाकू नका, खोल पाण्यात उतरू नका , मुर्तीची विटंबना होणार नाही ,कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्या. अशा प्रकारचे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले. देव देवतांच्या फोटो, काचेच्या वस्तू ,थर्माकोल, प्लास्टिकच्या बाटल्या, हार फुले , प्लास्टिकच्या माळी,पुजेचे साहित्य अशा कोणत्याच प्रकारच्या वस्तू निर्माल्य पाण्यात न टाकण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांना या ठिकाणी पाण्यात न उतरण्याचे देखील सांगण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तसेच मागील पंधरा वर्षांपासून या नदीकिनाराचा नदीघाट, नदी परिसर ,स्वच्छता राखण्याचे काम करणारे पोलीस मित्र ,स्वच्छता दूत केशव साळुंखे हे आपली या ठिकाणी सेवा बजावत आहेत.
दरवर्षी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींचा साठा होतो याकरिता यावर्षी ग्रामपंचायतीने मत्स्यपालनासाठी असणाऱ्या छोट्या तराफा बोटी उपलब्ध करून यामार्फत या बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे या गावचे विद्यमान सरपंच निलम संतोष झांजले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच कालपासून पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असल्याने या नदीकिनारी चिखल झाला आहे. वाहने चिखलात फसु नये ,रुतू नये याकरिता विसर्जनासाठी आलेल्या मोठ्या वाहनांधारकानी नदी पात्रात वाहने न आणण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.