वाई प्रतिनिधी – सुशील कांबळे
वाई: शिक्षणाप्रती समाजाची अस्था आणि जाणीव यात कमालीची वाढ झालेली दिसते. विद्यार्थी देखील करिअरची पुढील दिशा निश्चित करून आपल्या शैक्षणिक प्रवासाला हाताळताना दिसतात. पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीची परीक्षा महत्वाची ठरत असतानाच दहावी गुरूने पुढाकार घेत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
२५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात दररोज सायंकाळी ७ वाजता एसएससी बोर्डाचे तज्ञ शिक्षक या कार्यशाळेत विषयवार मार्गदर्शन करणार आहेत.
दहावी बोर्डाच्या मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याआधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी या कार्यशाळेचा मोठा उपयोग होणार आहे. ‘प्रथम सत्र परीक्षा आणि बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी कशी असावी’ या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात दररोज सायंकाळी ७ वाजता एसएससी बोर्डाचे तज्ञ शिक्षक या कार्यशाळेत विषयवार मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्यांना काहीसा अवघड वाटणारा इंग्रजी विषय २५ ऑक्टोंबर २३ रोजी प्रा. डॉ. श्रृती चौधरी सोपा करून देत अभ्यास करण्यासाठी काही क्लुप्त्या सांगणार आहेत.
२५ ऑक्टोंबर २३ च्या कार्यशाळेत प्रा. डॉ. देशमुख गणिताशी दोस्ती करण्याच्या टिप्स १०वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देतील शिवाय शंकांचे समाधान करतील.
प्रा. डॉ. माया कोटलीकर या हिंदी विषयाचा उलगडा करत अधिकाधिक मार्क कसे मिळवता येईल याबाबत मार्गदर्शन करतील.
मराठी भाषेतील जास्त मार्क मिळून देणारे प्रश्न-उत्तरे, निबंध लेखन व मराठीचा अभ्यास याविषयी प्रा. डॉ. स्वाती ताडफळे २८ ऑक्टोंबरच्या कार्यशाळेत उपलब्ध असतील.
विज्ञानातील संज्ञा, क्रिया, सुत्रे अशा कितीतरी मुद्द्यांचे सखोल ज्ञान आणि शंकाचे समाधान विद्यार्थी २८ ऑक्टोंबर रोजी प्रा. डॉ. सुलभा विधाते यांच्याकडून मिळवता येईल.
संस्कृत विषयात उत्तम गुण मिळवता येताता हा आत्मविश्वास घेऊन प्रा. डॉ. माधव भुसकुटे ३० ऑक्टोंबरच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भेटतील.
इतिहासाचा उलगडा करत प्रा. डॉ. शिवानी लिमये या ३१ ऑक्टोंबरच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. १ नोव्हेंबरची कार्यशाळा प्रा. डॉ. अतुल कुलकर्णी घेणार असून भुगोल विषयाचे मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
ही केवळ कार्यशाळा नसून तज्ञ शेक्षक विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्न यांची उकल करून देणार आहेत. जेणेकरून मुख्य परीक्षेत विद्यार्थी यशाला गवसणी घालतील.
या मोफत ऑनलाईन कार्यशाळेचा लाभ भाग घेण्यासाठी दहावीतील विद्यार्थ्यांनी ७७७५०२४४४५ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करायची आहे. दहावी गुरूच्या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.