रोटरी क्लब पुणे व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन
भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे खुर्द येथे रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगर पुणे ,भोर, राजगड यांच्या व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रविवार (दि.१८)पार पडले.यावेळी परिसरातील २५५ लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधील १८९ लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आणि २० रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाल्याने त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगरचे अध्यक्ष अविनाश तरवडे ,अजय वाघ,रोटरी क्लब राजगडचे अध्यक्ष डॉ रूपाली म्हेत्रे, सचिव अभिजीत बांदल, डॉ. आनंदा कंक, डॉ,संजय म्हेत्रे, श्रीकांत निकम ,विनय कुलकर्णी, बाळासाहेब नवले ,स्मिता काळे, गोसावीसर ,केशव शेटे, सविता थोपटे, सुनील थोपटे , बारे गावचे उपसरपंच दिपक खुटवड ,सुरेश खुटवड ,निखिल भालेराव ,महेश खुटवड ,अक्षय चव्हाण, पंढरीनाथ बदक, महेश खुटवड, शिवाजी बदक, पुनम बदक, दामिनी खुटवड, दत्तात्रय खुटवड , लक्ष्मण बदक, बसरापुरच्या सरपंच नीलम झांजले व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली बांदल हिने केले व आभार माउली बदक यांनी मानले.