शिक्रापूरः शेरखान शेख
विठ्ठलवाडी येथील मुख्य चौकात प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या माध्यमातून पांडुरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून भीमा नदीच्या विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे कौतुकास्पद पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले.
येथील भीमा नदीच्या विसर्जन घाटावर विठ्ठलवाडीसह तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कासारी यांसह आदी ठिकाणाहून गणेश भक्तांनी घरगुती तसेच गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे विसर्जन घाटावर केले. यावेळी मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी दिवसभरात एक हजार शंभर किलो निर्माल्य संकलित केले, तर ग्रामस्थांचा हा उपक्रम पाहण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी येथे भेट दिली. तसेच या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.
निर्माल्य संकलनाचा आदर्श पुणे जिल्ह्यातील सर्व गावांतील युवकांनी घेऊन पाण्याचे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करावा, असे दिपरतन गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य नवनाथ भुजबळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी गवारे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, बाळासाहेब गवारे, दिनेश राऊत, शंकर भुजबळ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य सागर ढमढेरे, संदीप गवारे, संभाजी शिंदे, पोलीस पाटील शरद लोखंडे, प्रकाश गवारे, ॲड. संतोष गवारे, दिलीप शेलार, के. टी. कोतवाल यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
निर्मल्य संकलनासाठी पृथ्वी फाउंडेशनने डजबीन, गणेश भक्तांसाठी संजय गवारे यांनी पिण्याचे पाणी, मुकेश खुडखुडिया, सुधीर ढमढेरे व सुनील ढमढेरे मित्र परिवाराने महाप्रसादची व्यवस्था करण्यात आली होती. तर सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनासाठी जयेश शिंदे यांनी लोकार्पण केलेल्या बोटीतून गणेश आंबेकर, बाळासाहेब गोंडावळे व चंद्रकांत गवारणे यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन केले. निर्माल्य व्यवस्थापनासाठी मेन चौक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.