भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि स्मार्ट विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौलीत व्हर्च्युअल क्लासरूम
भोर – विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली राज्य मॉडेल स्कूल म्हणून दर्जेदार शिक्षण देत असुन या दर्जेदार शिक्षणाबरोबरच नव्याने साकारलेल्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेऊन शैक्षणिक गुणवत्तेत अधिक स्मार्ट होतील असा विश्वास पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती तथा माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी व्यक्त केला.
शिक्षण संचालक प्राथमिक पुणे, व डिजिटल डेन पुणे तर्फे शाळेत तयार करण्यात आलेल्या व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन व इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. शाळेमध्ये उपलब्ध सोलर सिस्टिम ,संगणक शिक्षण, एम.एस.सी. आय.टी प्रशिक्षण ,सुंदर ग्रंथालय, प्रयोगशाळा, तसेच डिजिटल क्लासरूम यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. या सगळ्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शालेय दर्जा वाढण्यास मदत होत आहे.चालू वर्षी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत अद्वैत दळवी, काव्य शेडगे, विघ्नेश येडवे हे तीन विद्यार्थी पात्र झाले. पात्र विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक श्री अमर उभे सर यांना भेटवस्तू देऊन शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गौरविण्यात आले. तसेच मुख्याध्यापक सविता चोरगे, संगीता पापळ ,अनिता सुतार, विठ्ठल दानवले, अश्विनी पवार ,अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर, राजू गुरव, अफरीन तांबोळी, बोराडे या शिक्षकांचे टीमवर्क व, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले . आपल्या अंगातील सुप्त गुणांना विद्यार्थ्यांनी चालना द्यावी .खेळ ,कला, संगीत नाट्य ,क्रीडा या अंगाच्या विकासाबरोबरच प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती ,नवोदय अशा स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकावेत व भविष्यात या शाळेतून एम.पी.एस.सी, यू.पी.एस.सी परीक्षा देऊन मोठे अधिकारी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करत चालू वर्षी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व भविष्यात गुणवत्ता यादीत येणारे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी या प्रत्येकांसाठी सायकल देण्यात येणार असल्याचे रणजीत शिवतरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व मुलांना या प्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश शिवतरे, भगवान शिवतरे, शिवाजी शेटे, सचिन शिवतरे, सागर कुंभार, दशरथ शेटे, अशोक शेटे, सुनील सुतार, सारिका शिवतरे, स्नेहल शिवतरे ,नंदा धोंडे, मनोज खोपडे, सचिन पाटणे ,रघुनाथ भोसले, शामराव सावले अविनाश उभे,यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.