विक्रम शिंदे|राजगड न्युज
भोर दि.१४: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकांबे येथे माजी राष्ट्रपती डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती तसेच वाचन प्रेरणा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना डॅा.कलाम यांच्या विचारांचे मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना शिंदे म्हणाले,एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी आणि आपल्या जीवनाचा अणि समाजाचा उद्धार करावा.
यावेळी पंचायत समिती विषय तज्ञ सुनिल गोरड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास ओंबळे आदी उपस्थित होते.