Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

by SBPRNL
December 4, 2024
खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या गुणत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण न राहिल्याने विविध विकास कामांची गुणवत्ता ढासळली असून दर्जाहीन कामे केली जात आहेत. तसेच शासनाच्या पैशांचा विनियोग योग्य पद्धतीने होण गरजेचे असताना तसे होताना दिसत नसून कामांच्या गुणवत्तेची आणि संबंधित काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी केली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

शासनाच्या निधीमधून खंडाळा तालुक्यातील गावागावात सभा मंडप, अंतर्गत रस्ते कॉक्रटिकरण, गटारे व रस्त्यांच्या करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. यामधील बहुतांश कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून होत आहेत. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थाचा कारभार प्रशासकाकडे असल्याने या अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. निकृष्ठ व दर्जाहिन काम करीत केवळ टक्केवारी गोळा करण्यात खंडाळयाच्या अभियंत्यांनी धन्यता मानली असल्याचा गंभीर स्वरुपाचा आरोप यादव यांनी केला आहे.

अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणारः यादव यांचा इशारा 

तालुक्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीत शासनाच्या निधीची वाट लावली आहे. त्यामुळे झालेल्या कामांची तपासणी क्वॉलिटी कंट्रोलकडून करावी म्हणजे अधिकाऱ्यांचे हात डांबरात किती काळे झाले आहेत, हे जनतेसमोर येईल. याच बरोबर या अधिकाऱ्यांनी कमविलेली काळी माया यांच्या मालमत्तेची चौकशी झाल्यावरच कळेल म्हणून ही तपासणी व चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी यादव यांनी केली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना राजकीय अभय मिळत असेल तसेच जनेतेच्या पैशाने अधिकाऱ्यांनी आपली घर भरण्याचे काम सुरूच ठेवले तर आगामी काळात ज्या ठिकाणी अशी निकृष्ठ कामे केली जाते आहेत, त्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला आहे.

Tags: khandalaPunerajgadnewszp
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पुन्हा एकदा राज्यात देवेंद्रपर्व, उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

भाजप पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड; पुन्हा एकदा राज्यात देवेंद्रपर्व, उद्या फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group