Monday, July 20, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

by SBPRNL
October 4, 2025
दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

भोर  | भोर तालुक्यातील दिवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या गोविंद पांगारे यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी निर्धारित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पुणे यांनी हा निर्णय दिला आहे. या आदेशानुसार ११ जुलै २०२४ पासून त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

दिवळे येथील ग्रामस्थ सोपान बबन बाठे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आले होते की, सन २०२१ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्या पांगारे यांनी ‘नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)’ या आरक्षणातून कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दाखल केली व बिनविरोध निवडून आल्या. मात्र निवडून आल्यानंतर एक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची कायदेशीर अट असूनही त्यांनी ते सादर केले नाही.

You might also like

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

या तक्रारीवर सुनावणी घेऊन, सर्व पक्षांना नोटीस देऊन जिल्हाधिकारी यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर केला. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १६(२) नुसार तक्रारदाराचा अर्ज मान्य करून विद्या पांगारे यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्यात आले. परिणामी त्यांचे सरपंचपदही रद्द झाले आहे.

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विद्या पांगारे म्हणाल्या, “जिल्हाधिकारी यांच्या आदेशाविरोधात मी अपील करणार असून याबाबत माझे वकिलांशी चर्चाच सुरू आहे.”

Tags: #Divale #Bhor #Sarpanch #VidyaPangare #PuneDistrictCollector #GramPanchayat #Politics #CasteValidity #BreakingNews #RajgadNewsLive
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी
ताज्या बातम्या

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
Next Post
विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित

विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group