पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ यांचा एक हात मदतीचा
भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यात दुर्गम भागात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पसुरे येथे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना पसूरेचे विद्यमान सरपंच प्रविण ऊर्फ पंकज धुमाळ व उपसरपंच अनंता सणस यांनी शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप मंगळवारी(दि१८) करण्यात आले.
पसुरेत वाडी वस्त्यावर पाच शाळा आहेत.या पाच शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या एकूण ४३ विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन या शालेय वस्तूंचे वाटप केले. या वस्तूंमध्ये वह्या,पेन, पट्टी ,पेन्सिल, खोडरबर, शॉपनर अशा शालेय उपयोगी वस्तूंचा समावेश होता. कर्नवडीतील शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील या वस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी चेअरमन रामचंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्या वंदना कांबळे, केंद्रप्रमुख प्रा. पाटीलसर, ग्रामस्थ संदीप शिळीमकर, अंकुश खोपडे, रामदास शिळीमकर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
गावात नवनवीन उपक्रम राबवणार असुन गावातील विविध विकास कामे मार्गी लावुन शासनाच्या नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – ” विद्यमान सरपंच पंकज धुमाळ – पसुरे (ता.भोर)“