Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी

शिरवळ मधील महिलांकडून झालेल्या घटनांचा निषेध व्यक्त करत शिरवळ पोलिसांना निवेदन

by SBPRNL
August 24, 2024
महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी

महिलांना न्याय सुरक्षा मिळावी यासाठी शिरवळ मधील महिला स्व:ता स्वयंप्रेरणेने पडल्या बाहेर

शिरवळ- नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सामाजिक माध्यमांवर या घटनांविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नागरिकांना वाटते की महिला आजच्या समाजात असुरक्षित झाल्या आहेत.याच संदर्भात आज शिरवळ येथील महिलांच्या वतीने शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.

बदलापूर येथील घटना व राज्यात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवर नागरिक आणि महिलांच्या संघटना शासनाकडे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी कठोर कायदे करण्याची मागणी करत आहेत. विशेषतः महिलांच्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

You might also like

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

“आपल्या माता, बहिणी आणि मुलींना सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे,” असे महिलांनी सांगितले. “शासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कठोर कायदे करणे आवश्यक आहे.” यासाठी शिरवळ मधील महिलांनी वाढत्या महीला अत्याचाराचा विरोधात एकत्र येऊन पुर्ण गावातून रॕली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महीला सुरक्षेसाठी आंदोलन केले .व पोलीस स्टेशनमध्ये येऊन महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी निवेदन दिले. विशेषः या सर्व महीला कुठल्याही संघटना किंवा राजकीय पक्षांशी संबंधित नसून फक्त महिलांना न्याय सुरक्षा मिळावी यासाठी स्व:त स्वयंप्रेरणेने बाहेर पडल्या होत्या .

यावेळी उज्वला तांबे, अंबिका देशमाने, उज्वला साठे, शैला जावळे, दिपाली जगताप, छाया अडसूळ, अलका नेवसे , अंबिका पवार, माधुरी मांढरे, शैला सोनवणे ,सीमा तावडे, विद्या निवळकर , पूजा जगताप, संगीता सिंग ,पार्वती बिराजदार ,अनिता माने ,आशा कुरलेकर , श्रद्धा वाघ, आशा पवार, ज्योती तायडे, सरोजा राऊत आदी उपस्थित होते.

Tags: crimekhandalaShirwal
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड
क्राईम

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

July 19, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
Next Post

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group