वारवंड (ता. भोर) – येथील ज्येष्ठ नागरिक कलावती रामचंद्र दिघे (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे संपूर्ण जीवन धार्मिकता आणि साधेपणाने भरलेले होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. भोर तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष पोलीस पाटील सुधिर दिघे आणि युवा उद्योजक विठ्ठल (बापू) दिघे यांच्या त्या मातोश्री होत.