फुरसुंगीः येथे एका महिलेचा बेड कम सोफ्याच्या बॅाक्समध्ये मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मयत महिलेचा पती हा बाहेरगावी गेला होता. पुन्हा तो घरी परतल्यानंतर घरातमधील सोफाच्या बॅाक्समध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेतमध्ये आढळून आली. तत्काळ महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॅाक्टरांनी महिलेला मृत घोषित केले आहे. महिलेचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने फुरसुंगी हादरलेली आहे. स्वप्नाली उमेश पवार( वय २४) असे मयत महिलेचे नाव असून, तिचा पती हा उबेर टॅक्सीचालक आहे. बीड जिल्ह्यातील केज येथे गाडेभाडे घेऊन तो गेला होता. ८ नोव्हेंबर रोजी तो पुन्हा आपल्या घरी पहाटे ५ वाजता परतला. त्यावेळी सदर घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला बाहेरून कडी असल्याने त्याने दरवाज्याची कडी उघडून घरात प्रवेश केला. पत्नी घरात कोठेही नसल्याने त्याने विचारपूस करीत मोटारसायकलवरून पत्नीचा शोध घेतला. परंतु, पत्नी मिळून आली नाही. यानंतर घरात येऊन घरातील सोफा कम बॅाक्स उघडून पाहिला तर त्यामध्ये त्याची पत्नी बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आली. यानंतर या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेच्या गळ्याजवळ जखमा आढळून आल्या आहेत. मात्र, मृत्यूचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. महिलेचा श्वविच्छेदन झाल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला? याची माहिती मिळू शकेल. असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.