भोर प्रतिनिधी
तालुक्यात अनोळखी मृतदेह आढळण्याचे सत्र सुरूच
भोर शहरातील राजवाड्याजवळील नीरा नदी पात्रातील शनिघाटाच्या किनारी पाण्यात रविवार (दि.२६ )अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला असून तात्काळ भोर पोलीस घटनास्थळी पोहोचले व तपास सुरू केला आहे. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना असल्याने नीरा नदीत मृतदेह आढळण्याचे सत्र सुरूच आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी आंबेघर येथील नीरा नदी पुलाच्या बंधाऱ्यातील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता ही घटना ताजी असतानाच रविवार दि.२६ शहरातील राजवाड्याजवळील शनीघाटाच्या पाण्यावर २५ ते ३० वयाच्या आनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही महिला कुठली आहे ,कोण आहे, नक्की काय झाले याचा कसून तपास भोर पोलीसांनी तात्काळ सुरू केला आहे.