भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण बैठक पुणे-सातारा महामार्गावरील नवसह्याद्री महाविद्यालयात घेतली.
यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी आचारसंहितेचे कठोर पालन करून घेण्याविषयाच्या सूचना प्रशासकीय अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी अप्पर तहसिलदार पूनम अहिरे, भोर तहसिलदार राजेंद्र नजन, मुळशी तहसिलदार रणजित भोसले, राजगड नायब तहसिलदार श्रीनिवास ढाणे, राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पौड पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, वेल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ तसेच तिन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी, प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्व प्रशासकीय अधिकारी व पोलिसांची ही बैठक घेतलेली आहे. या बैठकीत आचारसंहितेचे कठोर पालन करून घेण्याविषयाच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा कोठेही भंग होणार नाही. याविषयी सांगितलेले आहे. त्यानुसार शासकीय व खाजगी मालमत्ता या ठिकाणी असलेले फेल्क्स, पोस्टर आणि बॅनर्स त्वरीत तेथून काढून घ्यावीत, असे आदेश खरात यांनी दिले आहेत. तसेच या गोष्टी काढल्या नाहीत, तर त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय पक्षांनी देखील आचारसंहितेतील तरतूदींचे पालन करण्याचे आवाहन खरात यांनी यावेळी बोलताना केले.
आचरसंहितेचा भंग केल्यास कारवाईः मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात
प्रचार सभा, कोपरा सभा, मैदान, रॅली, वाहने, लाऊडस्पीकर, हेलीपॅड आदी गोष्टींसाठी लागणाऱ्या परवानग्या मुदतीमध्ये प्राप्त करून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी कृती समिती कक्ष स्थापन केलेला आहे या तीन कक्षांचे प्रमुख तीन तालुक्यातील गटविकास अधिकारी असणार आहेत. परवानगी न घेता सभा वा इतर काही गोष्टी केल्यास त्यांच्यावर आचरसंहिता भंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.