भोर: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज भोर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने शासकीय नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यालयामध्ये मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मुली व मुलांमधून शाळेचा जनरल सेक्रेटरीची निवड करण्यात आली.
मुलांमधून समर्थ अजय खाडे व मुलींमधून पूर्वा खोपडे यांची चांगल्या मतांनी निवड झाली. उमेदवार म्हणून अनेक विद्यार्थी उभे राहिले होते. निवड प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून नववीची पूजा वालगुडे, कौस्तुभ नलवडे, वैष्णवी राऊत, वैष्णवी वरे या विद्यार्थ्यांनी कामकाज पाहिले. तर पोलीस शिपाई हिमांशू देशमुख यांने शिपाई म्हणून, तर चैतन्य जाधव याने पोलिंग एजंट म्हणून कामकाज केले. प्रत्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने बंद पेटीमध्ये चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. एकूण 490 मतदान झाले पैकी नोटाला 20 मतदान झाले. पूर्वा खोपडे ३२० व समर्थ खाडे 263 याला एवढी मते या दोघांना मिळाली.
हा अनोखा उपक्रम करण्याचे काम कार्यकुशल, कर्तव्यदक्ष प्राचार्य शेरखाने एम.एम. यांनी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रक्रियेमध्ये विशेष सहकार्य म्हणून पर्यवेक्षिका दिक्षित मॅडम, बाबर सर, शिकलगार मॅडम, बांदल मॅडम, घोरपडे सर, रांगोळे मॅडम व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी सहभाग घेतला होता. या अनोख्या उपक्रमामुळे मुलांना गुप्त मतदान पद्धतीने मतदान समजावे हा हेतू होता. या उपक्रमाचे पालक व समाजातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाची सर्व फोटोग्राफी प्रा. बांदल सर व बाबर सर यांनी केली.