भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसराची जागेच्या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (sambhaji bhide) यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने उपोषण कर्त्याला पाठिंबा दर्शवणारे विधान केले होते. आता या प्रकरणी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे व त्यांच्या सहकार्यांनी भिडे गुरुजी यांची भेट घेतली आहे.
या जागेबाबात भिडे गुरुजींना सुरु असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने संबधित जागेबाबत अपूर्ण व चुकीची माहिती देत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीवेळी डोंगरी विकास परिषदेचे मानद सचिव अशोक थोपटे यांनी या प्रकरणाची संपूर्ण सत्यता उलघडणारी कागदपत्रे त्यांच्या समोर मांडून माहिती दिली. त्यावर भिडे गुरुजींनी नवरात्रीच्या सणानंतर भोरमध्ये येऊन शंकेचे निरसण करु, असे फोनद्वारे तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी कळवले आहे. आता या प्रकरणावर संभाजी भिडे नवरात्रीनंतर भोरमध्ये येऊन काय बोलणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते भिडे गुरुजी
शिवछत्रपतींचा अधिकार असलेल्या स्फुर्ती देणारा ठेवा ही राष्ट्राची संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यावरचा अधिकार आम्ही सोडतो असे त्यांनी मन मोठं करुन समाजाच्या समोर आदर्श करावा, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले होते. तसेच समजा त्यांना ही बुद्धी सुचली तर आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे सर्वांचे भाग्य, नाहीच सुचलं तर आपल्याला या घडलेल्या चुकीच्या विरुद्ध शासन दरबारी सर्व समाजाला घेऊन उभं राहवं लागेल असे देखील भिडे गुरुजी यांनी सांगितले.