भोर: शहरातील मंगळवार पेठेतील सुभाष चौकात गटाराचे वाहनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आहे. मात्र, हे काम करीत असताना पाईप लाईन फुटल्याने रस्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या ठिकाणी चिखल होऊन राडारोडा झाल्याने तसेच गेल्या अनेक महिने हे काम रेंगाळलेल्या अवस्थेत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले असल्याचे पाहिला मिळत आहे.
काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अरेरावीची भाषाः नागरिकांचा आरोप
हे काम करीत असताना जेसीबीच्या साह्याने खोदाई करण्यात येत आहे. ही खोदाई करताना येथील एका घराच्या फाऊंडेशला धक्का लागल्याने घर पडण्याचे अवस्थेत आले असून, या प्रकरणी हे काम करणाऱ्या ठेकेदाराला बोलायला गेल्यास संबंधित व्यक्तीकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच हे काम करताना दुजाभाव केल्याचा देखील नागरिकांचे म्हणणे आहे.
सात महिन्यांपासून काम रेंगाळलेल्या अवस्थेत
भोर शहरात पुर्वी संस्थानकालीन जमिनीखाली खोलवर तोडीव दगडी गटारे तयार करण्यात आली होती. सदरची गटारे सुस्थितीत होती. रस्त्यावरील काँक्रेट केली असून त्यावर ब्लाँक भोर नगरपलिकेकडून नगरपालिका ते एसटी स्टँड दरम्यान दोन्ही बाजूची गटारे खोदून पाईप टाकून त्यावर पेव्हिंग ब्लाँक टाकणे हे काम मंजूर आहे. सदर कामासाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. गेल्या सात महिन्यांपासून सदरचे काम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. याचा नाहक त्रास शहरासह बाहेरील नागरिकांना होत आहे.
नागरिकांची नाराजी
या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी राजगड न्यूजशी बोलताना सांगितले. गटाराचे काम लवकरात लवकर करुन नागरिकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.