सारोळा: माणसांतला देव म्हणून डॅाक्टरकडे पाहिले जाते. रुग्णांच्या आजारांचे निदान करुन त्यास तत्काळ उपचार करुन बरा करतो तो म्हणजे डॅाक्टर. येथील मंदार माळी अशाच डॅाक्टरांपैकी एक आहेत. तळागळातील गोरगरिब रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी माळी हे मनोभावे रुग्णांची सेवा करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना २०० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या याच कार्यची दखल घेत विघ्नहर्ता प्रतिष्ठान किकवी येथे भोंगवली आरोग्य केंद्रामध्ये १०८ अंबुलन्सवरील तात्काळ वैद्यकीय अधिकारी मंदार माळी यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
आहोरात्र तळागळातील सर्वसामान्यांची मनोभावी सेवा करणारा गोरगरिबांचा डॅा. मंदार माळी यांची कामगीरी कौतुकास्पद आहे. आजवर त्यांनी १२०० अधिक महिलांचे प्रसुतीचा टप्पा पुर्ण केला असल्याचे माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.
भोंगवली आरोग्यकें द्रामध्ये २०१३ पासून सेवा करतोय. रस्ते अपघातग्रस्त, भाजलेले रूग्ण, सर्पदंश तसेच १२०० हून अधिक महिला प्रसुती व इतर ३५०० हून अधिक रूग्णांची सेवा त्यांनी केली आहे. त्यांना आदर्श डॅाक्टर पुरस्कार, ससून पुरस्कार, पुणे जिल्हा पुरस्कार यांसह २०० हून अधिक तरूण मंडळे, राजकीय नेते व सामाजिक संस्थानी सन्मानित केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी देखील माझ्या कामाचे कौतुक केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी मंदार माळी यांनी सांगितले.
त्यावेळी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे उपाध्याक्ष प्रकाश तनपुरे, उद्योजक सुनिल धाडवेपाटील, कामगार नेते नारायण भिलारे, मा. सरपंच ज्ञानोबा सांळूके, मा. उपसरपंच किरण येवले, हाडवैद्य यशवंत सांळूके, किशोर बारणे, एकनाथ राऊत आदी उपस्थित होते.
आरोग्य केंद्राची वैद्यकीय सेवा करताना मासीक पाळी आजार, मातृत्वासाठी व इतर आजारांसाठी मार्गदर्शन करून अनेक कुंटूबीयांचे जीवन सुखी केले आहे.
-चंद्रकांत बाठे (माजी सदस्य, जिल्हा परिषद)