भोर:वैशाली टाकी समोर चैपाटी भोर येथील एका तरुणावर त्याच्या मित्रानेच कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याची आईही जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी रात्री 12:30 च्या सुमारास, मारुती मोहिते (वय 22) हा आपल्या आई सुमन मोहिते यांच्यासोबत झोपडीत झोपला होता. त्यावेळी त्याचा अल्पवयीन हा रागाच्या भरात झोपडीत घुसून आला मारुतीला बाहेर येण्यास सांगितले.
बाहेर आल्यानंतर त्याने कोयत्याने हल्ला केला. मारुतीने हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असताना त्याच्या हाताला दुखापत झाली. याचवेळी, मदतीसाठी आवाज देत धावून आलेल्या आईलाही त्याने शिवीगाळ करत जखमी केले. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू भोर पोलिस करीत आहेत.