कुंदन झांजले|राजगड न्युज
भोर : भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वरंध घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत कार ९० फूट खोल दरीत गेल्याची घटना बुधवारी ता.१८ रोजी दुपारी घडली असून सुदैवाने गाडीत कोणही नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता.भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले असता चालकाने चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले. परंतू अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला.मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले. या बाबत भोर पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत अपघाताबाबत कोणतेही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलीस स्टेशन कडून सांगण्यात आले.