नसरापूर : पुणे सातारा महामार्ग वरील किकवी गावच्या हद्दीत वीटभट्टी वरील पाणी साठवण्याची टाकी फुटून मोठा अपघात झाला सदर घटना सोमवार दि. १२ रोजी दुपारी घडली या अपघात तीन वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात एक सोळा वर्षीय मुलगी देखील गंभीर जखमी झाली असून जखमी मुलीला जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार, किकवी गावामध्ये सुरू असलेल्या वीडभट्टी व्यवसाय या व्यवसायाला लागणारे पाणी साठवण्यासाठी मागील पंधरा दिवसांपूर्वीच पाण्याची टाकी बांधली गेली होती त्या ठिकाणी काम करणारे कामगार रोजच्या प्रमाणे पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरत होते त्याचवेळी ती टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली व त्यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर त्यामध्ये सोळा वर्षीय मुलीगी गंभीर रित्या जखमी असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची तीव्रता एवढी होती की शेजारील असलेल्या घराची देखील भिंत पडून घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.