पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकल्याचे वृत्त माध्यमांमध्ये देण्यात आले होते. या प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. बांदल यांना ईडीने बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लाॅड्रिंग) प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्या दोन्ही निवासस्थानी ईडीच्या पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.
त्यांच्या शिक्रापूर येथील बुरुंजवाडी, तसेच हडपसर येथील महंमदवाडी निवासस्थानांवर सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) छापे टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत. बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. तसेच बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र, त्यांची गु्न्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमदेवारी रद्द करण्यात आली होती. शिरुर विधानसभा मतदार संघातून बांदल निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच ते विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती मिळत आहेत.
पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.