स्त्री २ या सिनेमाने २०२४ मध्ये आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्वच सिनेमांचे रेकार्ड मोडले असून, सिनेमाने आतापर्यंत तब्बल ३०० कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे. या सिनेमाचा हा दुसरा आठवडा असून, स्त्री २ ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. खरंतर स्त्री या सिनेमाचा पहिला भाग देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये प्रथमच हॅारर कॅामेडी हा जॅानर स्त्री या सिनेमाने आणला आणि याला प्रेक्षकांची भरभरून दाद लाभली. सिनेमाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्याकर घेतले आहे.
खेल खेल में आणि वेदाला फटाका
स्त्री २ सिनेमाच्या रिलीजवेळी खेल खेल में आणि वेदा हे सिनेमे देखील रिलीज झाले. मात्र, स्त्री २ ची क्रेझ प्रचंड असल्याने त्याचा खूप मोठा फटाका या दोन सिनेमांना बसल्याचे दिसते. दुसऱ्या आठवड्यात तिकीटबारीवर स्त्री २ चा बोलबाल आहे. पुढचा संपूर्ण आठवडा हा सिनेमा पडद्यावर असणार असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे सिनेमाला मिळणारी प्रेक्षकांची दाद हे आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि अचूक टायमिंग साधत आपल्या अभिनयाच्या जादूची भूरळ प्रेक्षकांना घालणारा अभिनेता पंंकज त्रिपाठी व इतर सहकलाकर सिनेमात असल्याने त्याचा मोठा फायदा सिनेमाला झाल्याचे दिसते. अमर कौशिक या दिग्दर्शकाने हॅालीवूटपटांमध्ये सुपरहिरो असतात. तशे सुपरहिरो त्याच्या सिनेमात निर्माण करण्यात आले आहेत. हे वाक्य लिहिण्याचे कारण स्त्री २ पाहिल्यावर समजू शकेल.