भिगवण : मदनवाडी येथील तेजस एकनाथ देवकाते यांची पुणे जिल्हा भाजपच्या चिटणीसपदी निवड झाली. तेजस देवकाते हे भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी कार्यरत होते. ते सध्या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा कार्यरत आहेत. तेजस देवकाते यांनी यापूर्वी मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद भूषविले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभावीपणे काम केले. निर्मल वारी अभियान, विविध आंदोलने, ‘मन की बात’, ‘परीक्षा पे चर्चा’, ‘हर घर तिरंगा अभियान’, ‘तिरंगा रॅली’, रक्तदान शिबिरे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. तसेच कुस्ती स्पर्धा, दहीहंडी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले.
तालुक्यातील प्रभावी युवा कार्यकर्ता, उत्तम संघटन कौशल्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी असलेला थेट जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. (Bhigwan News) त्यामुळे पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होणार आहे. या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली (Bhigwan News) आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वात देवकाते यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.