जागतिक महिला दिनानिमित्त पाककला, उखाणा व रांगोळी स्पर्धा.
अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद व पुरस्काराचे वितरण
भोर: तालुक्यातील उन्नती महिला प्रतिष्ठान, तनिष्का व्यासपीठ भोर व मराठा महासंघ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील महिलांसाठी रविवार (दि ४) विविध कार्यक्रम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी झालेल्या या कार्यक्रमात पाककला ,उखाणा व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कामगिरी करणाऱ्या २५ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम दोन सत्रात घेण्यात आला. सकाळच्या सत्रात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी स्पर्धा निरीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या भोर पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक शिला खोत, अध्यक्षा सीमा तनपुरे, तनिष्का व्यासपीठाच्या नसरापुरच्या प्रतिनिधी वैशाली झोरे, वृषाली पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तर संध्याकाळच्या सत्रात कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व भोरच्या उपविभागीय वन अधिकारी शितल राठोड यांच्या व मान्यवरांच्या हस्ते महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मराठा महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष युवराज दिसले , मराठा महासंघ पुणे शहर चिटणीस भागेश्री बोरकर, राजीव केळकर, समिर घोडेकर, गणेश पवार, विनायक तनपुरे,शहिदा आतार, रेखा टापरे, निसार नालबंद आदी मान्यवर होते.सुत्रसंचालन सविता थोपटे व सुरेश देशमाने तर आभार स्नेहा धरु यांनी मानले.
पाककृती स्पर्धेत भोर शहरातील सुमेया आतार प्रथम, आरशिनाझ आतार द्वितीय ,गितांजली पवार तृतीय , गौरी गाडेकर,श्रद्धा कांबळे, दिपाली धरु यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
रांगोळी स्पर्धेत प्रियंका घोरपडे प्रथम , संध्या झगडे द्वितीय , स्वाती गुंड तृतीय, शुभांगी कांबळे चतुर्थ, मोनिका मोहिते, पोर्णिमा जावीर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
उखाणा स्पर्धेत मीना चव्हाण प्रथम, रुक्मिणी कांबळे द्वितीय, श्रद्धा कांबळे तृतीय, तर अर्चना रोमण हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.सामाजिक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांमध्ये
सिध्दी खोपडे, प्रमिला निकम, रश्मी म्हसवडे, सीमा पाटणे, मनिषा सोनवणे,रुपाली म्हेत्रे, स्वाती किंद्रे, प्रिती शहा, प्रतिभा कन्हेरकर, शर्मिला खोपडे, संचिता सुपेकर, सुर्वणा पोखरकर,अरुणा कुमकर, वैष्णवी रोमण,अक्षदा खोपडे, सई भेलके, अश्विनी मादगुडे, द्वारका वालगुडे, सुरेखा दिघे, भारती कांबळे, शैलजा ताठे, सुषमा कंक, अरुणा वेदपाठक, उज्ज्वला टिळेकर, विश्वा महिला बचत गट भोर अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याचबरोबर ज्ञानेश्वर (माऊली)बदक यांना विशेष सामाजिक पुरस्कार, जानाई देवी यात्रा व श्रीराम नवमी उत्सव कमिटी भोर आणि नामदेव जनाबाई संत सेवा संस्था भोर यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.
यावेळी द्रौपदी भेलके, रेखा धरु,भाग्यश्री वर्टे, सुरेखा भेलके, मेघा आंबवले, रेखा टापरे, सुप्रिया धरु, सुजाता धुमाळ, शर्मिला खोपडे, निर्मला किंद्रे,विद्या कांबळे,स्नेहा धरु, स्मिता सुर्वे,सविता थोपटे, शोभा गोसावी, मिना चव्हाण पल्लवी फडणीस,शैलजा गुरव,कोमल भेलके, वैशाली बांदल, रत्नमाला समगीर, सुषमा कंक, अश्विनी धोंडे, अर्चना रोमन, समृध्दी तनपुरे, संध्या झगडे, मनिषा पडवळ, सुनिता बदक, स्वाती जगताप, दिपा चिकणे यांनी विशेष सहकार्य केले.