भोर: शहरातून पंचेचाळीस हजार रुपयांचा गांजा (नशीला पदार्थ) नेण्यात येत असल्याची खबर भोर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. पोलिसांनी त्वरित मिळालेल्या माहिती नुसार शहरापासून हाकेच्या अंतरावरील महाड नाका परिसरात संजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून गांजा घेऊन जाणा-या तरुणास मुद्दे मालासह ताब्यात घेतले आहे.अजय किसन गुमाने (वय २१ रा.अनंतनगर झोपडपट्टी,महाड नाका भोर) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोरचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांना खबऱ्यामार्फत भोर शहरातून महाडच्या दिशेने एक जण गांजा घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावला. महाड नाका इथून संजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारती समोर संशयास्पद तरुण उभा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळील पोत्यात साडेचार किलो उग्रवास असलेला गांजा आढळून आला. गुमाने यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी
पोलीस हवालदार दतात्रय खेंगरे यांनी फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड पांडुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक शिला खोत ,पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, पोलीस हवालदार विकास लगस, पोलीस नाईक दत्तात्रय खेंगरे, पोलीस हवालदार अविनाश निगडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर झेंडे, महिला पोलीस प्रियांका जगताप भोरचे कोतवाल धिरज दानवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे