मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते गृह प्रवेश
भोर तालुक्यातील वडगाव डाळ ही ग्रामपंचायत सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहेत.अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी पंतप्रधान जनमन घरकुल आवास योजनेर्तंगत वडगावडाळ (ता.भोर) येथील कातकरी समाजाच्या ३५ नागरिकांचा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते हक्काच्या घरात गृह प्रवेश करण्यात आला. ग्रामपंचायत वडगाव डाळ येथील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील गरीब वंचित आदिवासी कातकरी जमातीच्या ३५ लाभार्थ्यांचे पी.एम.जनमन घरकुल आवास योजनेतर्गत घरकुलांचे एकाच ठिकाणी काम करण्यात आले आहे. सदर घरकुलाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केली. यावेळी आशा नथु पवार, रेखा मंगेश वाघमारे या लाभार्थांच्या घरकुलाचे गृहप्रवेश मुख्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, विस्तार अधिकारी माणिक घोगरे, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर खटके, सरपंच नवनाथ चौधरी, उपसरपंच शुभम उल्हाळकर ,ग्रा.प.सदस्य सुधिर खोपडे, संदीप गायकवाड, वंदना चौधरी ,रुपाली बरदाडे, रोजगार सेवक नवनाथ डाळ व व गावातील आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले प्रधानमंञी जनमन घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांना स्वत:चे हक्काचे घर मिळाले असुन गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी लाभार्थाना मदत मिळवुन देऊन अत्यंत चांगली घरकुले बांधली आहेत असे बोलून त्यांनी गटविकास अधिकारी धनावडे यांचे कौतुक केले. सदर कातकरी समाजाची घरकुले शासनाने दिलेल्या पैशात पुर्ण होत नसल्यामुळे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पञे रंगरंगोटी, खिडक्या, दरवाजे यासाठी आर्थिक मदत मिळवुन दिली आणि घरकुल लवकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत देखील त्यांनी केली असे लाभार्थ्यांनी सांगितले.