रस्त्याच्या कडेला कार्यक्रमातील शिल्लक अन्न, हॉटेल,हॉस्पिटल, घरगुती,मांस मच्छी व्यावसायिक दारांचा कचरा ढीग, महिलांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
भोर शहरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने एसटी बस स्थानक ते पद्मावती नगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यालगत दुतर्फा कचरा टाकल्याने संबंधित रस्त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता वैकुंठ स्मशानभूमीच्या बाजूने पद्मावती नगर पर्यंत जात असल्याने संबंधित रस्त्याला शहरातील हॉटेलमधील ,तसेच कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले खराब अन्न, तसेच मांस मच्छी कचरा, सडलेला भाजी पाला,हॉस्पिटल मधील प्लास्टिक पिशव्या,सलाईन बाटल्या कचरा , हॉटेलमधील कचरा, तसेच घरगुती फाटके कपडे ,घरगुती प्लास्टिक कचरा, बाटल्या रस्ता एका बाजूला असल्याने निदर्शनास येऊ नये म्हणून नागरिकांकडून तसेच व्यावसायिकदारांकडून टाकला जात आहे . परंतु हा कचरा या रस्त्यालगत टाकल्याने येथील पदमावतीनगर मधील रहिवाशांना या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. सर्व परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. महिलांसह , लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संबंधित नगर मधील नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार नगर प्रशासनाकडे केली असता संबंधित विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे , तसेच या भागातील नगरसेवक देखील विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रमात दंग झाल्याने त्यांचेदेखील नागरिकांकडे पूर्णतः दुर्लक्षच होत आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराकडे निखिल नांगरे, रमेश वाळंजकर या नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.