किरण दगडे पाटील यांचा एक हात मदतीचा , अतिवृष्टीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत मदतीचे आश्वासन
भोर तालुक्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्याच्या हिरडस मावळतील नीरादेवघर धरण खो-यात मागील आठ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांसह , सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. या भागात असणाऱ्या दापकेघर व कंकवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शालेय साहित्याचे देखील अति मुसळधार पडणाऱ्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या जनजीवन विस्कळित झालेल्या ठिकाणी विधानसभा प्रमुख तथा माजी नगरसेवक किरण दगडे पाटील युवा मंचने पाहणी करून तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा पुढे करत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत मंगळवार दि.३० रोजी कंकवाडी, दापकेघर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना किरण दगडे पाटील यांचे वतीने दप्तर, वह्या, कंपास , पट्टी , पेन्सिल , पेन , शॉपनर, खोडरबर अशा अनेक शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. जवळपास ४० ते ५० विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळेसाठी आवश्यक ती मदत करण्याचे तसेच शाळेमध्ये जाताना येताना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी रेनकोट देण्याचे आश्वासन दगडे पाटील यांनी दिले.
भविष्यात या दुर्गम आणि डोंगरी भागातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आवश्यक ती मदत किरण दगडे पाटील युवा मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी किरण दगडे पाटील यांनी बोलून दाखवला.
या प्रसंगी भोर तालूका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, अप्पासाहेब चोंधे, भरत गुड्डमवार, नितीन कानगुडे, सह्याद्री सर्च आणि रेस्क्यू फोर्सचे सचिन देशमुख, तुषार धोटे, समिर देशमुख, नथुभाऊ कंक, महीपती धानवले, शिक्षक अनंत अआंबवले, रामदास धनावडे, अशोक घिगे गावातील ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित होते.