लहान मुलांनी आपल्या अभिनयाने सादर केल्या नाट्यछटा
लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी,व मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालरंग भूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख तालुका स्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन भोर तालुक्यातील भोलावडेच्या विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये बुधवार (दि३१) करण्यात आले होते. त्यासाठी भोर तालुक्यातील राजा रघुनाथराव विद्यालय, जिजामाता हायस्कूल, गर्ल हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल अशा सात शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांसाठी बालरंगभूमी परिषद पुणे प्रमुख कार्यवाहक देवेंद्र भिडे, स्मिता मोघे, परिक्षक म्हणून प्रा.भूतकर ,उमेश देशमुख केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे व प्रमुख पाहुणे यशवंत डाळ , जेष्ठ पत्रकार विजय जाधव, विलास मादगुडे ,किरण अंबिके या कार्यक्रमास उपस्थित होते.
या नाट्यछटा स्पर्धेत भोर तालुक्यातून सात शाळांमधून ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध अनेक सामाजिक विषयांवर नाट्यछटा सादर केल्या. पाणी प्रश्न, मोबाईल फोनचा अतिवापर, दारूबंदी, अंधश्रद्धा,प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, ऐतिहासिक गड आला पण सिंह गेला, राजकीय मी सरपंच, चाय वाला, गावरान गंगु, स्त्री भ्रूणहत्या, आईची पसंती, गजरेवाली, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, अंधश्रद्धा निर्मूलन, माझा दादा, मास्तर आणि विद्यार्थी, मी फुलराणी, बोल घेवडी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा छोट्या नाटकांमधून अनेक नाट्यछटा मुलांनी सादर केल्या.
या स्पर्धांसाठी चार गटांची निर्मिती केलेली होती या गटातून आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. गट क्रमांक १ मधून प्रथम क्रमांक विद्या प्रतिष्ठानचा स्कूचा- राही सुरज महाडिक, गट क्रमांक २ मधून जिजामाता विद्यालयातील प्रथम क्रमांक – आर्या अमृत शिवभक्त आणि द्वितीय क्रमांक- शर्वरी ज्ञानेश्वर खोपडे, गट क्रमांक ३ विद्या प्रतिष्ठानचा प्रथम क्रमांक- हीर अमित ओसवाल व द्वितीय क्रमांक – आयुष सचिन कोंढाळकर, तर तृतीय क्रमांक राजा रघुनाथराव विद्यालयातील श्रद्धा ज्ञानेश्वर साळुंके, गट क्रमांक ४ मधून राजा रघुनाथराव विद्यालयतील प्रथम क्रमांक अदिती सचिन लोहोकरे हिचा तर द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठानच्या – स्पर्श नितीन बोडके याने पटकाविला.यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांनी केले. तर आयोजन मराठी विभाग प्रमुख रुपाली नेवसे, सांस्कृतिक विभाग रागिणी भोसले, संगीत शिक्षक प्रा खोपडे , सहशिक्षक संतोष मादगुडे , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.