विक्रम शिंदे|राजगड न्युज
भोर दि.१३ : सण ,उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिस कर्तव्य बजावत असतात.नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने शहरातील हरजीवन हॉस्पिटलमध्ये भोर, राजगड आणि सासवड पोलीस स्टेशनच्या सर्व पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलिस ठाण्यातील सुमारे ५० पोलिसांनी यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना,गुन्ह्यांचा तपास,आंदोलने,मोर्चे, व्हीआयपींचे दौरे,गस्त, सण,नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलिस समाजाचे रक्षण करण्यासाठी २४ तास कर्तव्य निभावत असतात.परिणामी त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या संकल्पनेनुसार एक्स-रे,इसीजी,2-डी इको,रक्तदाब,रक्त व लघवीच्या विविध अंदाजे ७ हजार २०० रुपये किंमतीच्या तपासणी यावेळी मोफत करण्यात आल्या.
हरजीवन हॉस्पिटलने यासाठी विशेष सहकार्य केले.एम,डी,मेडिसिन तसेच आहार तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला पोलिसांना मोफ़त देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले.डॉ.अमित शेठ, हृदयरोग तज्ञ डाॅ.ओंमकार थोपटे,सोनोग्राफी तज्ञ,डाॅ.शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली तपासणी शिबिर संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.शिबिरस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे,भोरचे पोलीस निरिक्षक शंकर पाटील,राजगड नसरापूर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप,पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे,दत्तात्रय खेंगरे,विकास लगस,उद्धव गायकवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.हाॅस्पिटल व्यवस्थापक तुषार साळेकर,तन्मय कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.