प्रतिनिधी : विक्रम शिंदे
भोर दि.१८ :शहरातील संजय नगर भागातील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरातील श्री भवानी देवी व श्री अंबाबाई देवीला एका भक्ताने पांच किलो चांदीचे दोन मुकुट, पायातले तोडे,जोडव्या असे अलंकार अर्पण केले आहेत.स्वामीं समर्थ मंदिरात धार्मिक पद्धतीने अलंकारांचे विधिवत पूजन आणि अभिषेक करुन दागिने देवीला वाहण्यात आले.
माजी मुख्याध्यापक दत्तात्रय सहस्त्रबुध्दे ,जेष्ठ पत्रकार सुरेश शेटे यांचे हस्ते अलांकारांचा विधिवत अभिषेक करण्यात आला.यावेळी मयुरेश रायरीकर,मुकुंद रायरीकर,सीमा रायरीकर ,योगेश शेटे राजश्री शेटे,रिटा सुरतवाला ,निखील पवार ,सोनल पवार गणेश शिंदे ,अभिमान इंदलकर तसेंच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.सद्या नवरात्र उत्सव सुरू असून नवरात्र उत्सवा निमित्य ९ दिवस मंदिरात भजन,किर्तन होमहवन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .