विक्रम शिंदे|राजगड न्युज
भोर दि १६: शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावांचा विकास नागरिकांनी करायला हवा असं सांगून दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत असून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी पार पाडण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रवीण दबडघाव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कापूरहोळ येथील शिवाजी विद्यालयास स्किल विकास फाउंडेशन,पुणे यांच्या वतीने डॉ.प्रवीण दबडघाव यांच्या उपस्थितीत ई-लर्निंग किटच वाटप करण्यात आले.यावेळी डॉ. दबडघाव बोलत होते.या प्रसंगी स्किल विकास फौंडेशनच्या माधुरी देशपांडे,धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान कापूरहोळ अध्यक्ष सागर गाडे ,किरण बोरगे,सोमनाथ कुलकर्णी ,श्रीकांत जोशी सुनंदा बलुगडे,ग्रामपंचायत सदस्य वनिता सपकाळ उपस्थित होते.प्राचार्य शिंदे यांनी बदलत्या शिक्षणाची दिशा यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार महेश मालुसरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी सर ,भोसले सर, काळे सर, गायकवाड मॅडम, ढवळे मॅडम,मालुसरे सर यांनी विशेष सहकार्य केले.