बाळु शिंदे: राजगड न्युज
कापूरहोळ : भोर तालक्यातील बिबट्यांची संख्या दिसेंदिवस वाढत आहे. गावागावात बिबट्याचा वावर नागरिकांना पाहायला मिळतो आहे. भोर तालुक्यातील करंदी खे. बा. गावच्या शिवारात बिबट्याचे नुकतेच दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावण आहे.गावच्या रहिवाशी परिसरातबिबट्याने मानव वस्तीमध्ये प्रवेश केल्याने ग्रामस्थात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्या आला रे आला रे ही माहिती गावातील सोशल मीडियात ग्रामस्थांनी मेसेज टाकला, बिबट्या पासून सावध राहा, सध्या करंदीकर बिबट्यामुळे भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस जिल्हा परिषद रस्त्याच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या बाबत तातडीने नसरापूर वनविभाग कळविण्यात आले.त्यावर कर्मचारी यांनी भेटदेवून माहिती घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचित केले.
याबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते म्हणाले की ,गावात नागरिकांवर आणि पाळीव प्राण्यांच्यावर बिबट्याने हल्ले करण्यापूर्वी वणविभाने सापळा लावून त्याला पकडणे गरजेचे आहे. विद्यार्थी नागरिक शेतकरी महिला यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन अधिकारी, कर्मचारी साहेब, अहो लक्ष द्या, बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी आर्त मागणी वनविभाग नसरापूर यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.