अतिवृष्टीमुळे दरड प्रवण क्षेत्रातील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
भोर तालुक्यातील घाट माथ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात अति वृष्टी होते असल्याने ओढे, नाले, नदीला पाणी वाढल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. गावागावांतुन शेतीच्या भात खाचरातुन पाणी येऊन बांध फूटणे, वाहुन जाणे,दरड कोसळणे, रस्ता वाहून जाणे, रस्ता साईट पट्ट्या खचणे , वाहुन जाणे, पाणी तुंबणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरड प्रवण क्षेत्रात येणाऱ्या गावांना प्रशासनाने सावधगिरी बाळगुन सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातील वरंधा घाटातील धानवली व कोंढरी (ता.भोर) ही गावे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने या गावातील ६० ते ७० नागरिकांचे लहान मुलां, महिलांसह स्थलांतर धारांबे येथील मठा़त करण्यात आले आहे असे भोरचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडून सांगण्यात आले.
तालुक्यात सर्वत्रच पुरस्थितीचा आढावा घेऊन भोरचे तहसीलदार सचिन पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोरचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार तसेच महसुली विभागातील सर्कल, तलाठी, ग्रामसेवक,कोतवाल व प्रशासकीय सेवेत असणारे सर्वच अधिकारी पूर परिस्थिती असणाऱ्या भागात स्वतः भेट देऊन पाहणी करत आढावा घेत आहेत.स्थानिकांना धीर देत सतर्कता बाळगावी असे आवाहन करत आहेत. सद्यस्थितीला डोंगरावर, दुर्गम भागात, मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातील गावांनी सतर्कता , सावधानता बाळगावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
श