भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर: शहरातील नागरिकांनी भोर नगरपरिषद प्रशासना विरुद्ध लादलेल्या अन्यायकारक घरपट्टी करवाढ विरोधात गुरुवार दि१२ सकाळी भोर एसटी स्टँड ते नगरपालिका कार्यालया पर्यंत काळे झेंडे दाखवत,हलगी डफ,ताशा वाजवित, नगरपरिषदेच्या प्रशासनावर विरूद्ध घोषणा देत, नागरिकांना सतर्क करून मोर्चात सामील करत विराट मोर्चा काढण्यात आला .
यावेळी भोरमधील असंख्य महिला-पुरूष नागरिकांनी नगरपरिषदेविरुद्ध असंतोष व्यक्त करत या विराट मोर्चात सहभाग घेतला. यावेळी भोरमधील काही राजकीय पक्षांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दर्शवला. या मोर्चात प्रामुख्याने जुनी पहिली असणारी घरपट्टी कायम करावी ही प्रामुख्याने मागणी केली आहे.या मोर्चात घरपट्टी करवाढ विरोधात नगरपालिकेचा “जाहीर निषेध” असे फलक देखील लावण्यात आले होते.
या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.