भोर : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,” पुढच्या वर्षी लवकर ,” या अशा जय घोषात भोर तालुक्यात विसर्जन सोहळा पार पडला.यावर्षीही पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन मोठ्या थाटात माटात वाजत गाजत झाले. तालुक्यातील नदीघाटांवर सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. तालुक्यातील बसरापुर या ठिकाणच्या नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी गावातून ,भोलावडे ,भोर शहरातून , तसेच अनेक आजुबाजुच्या परिसरातुन गणेश मूर्ती विसर्जनासाठी आल्या होत्या.
या गणेश मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन व्हावे तसेच नदी घाट परिसर कसा स्वच्छ राहील याकडे पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन , सरपंच नीलम झांजले,गावचे स्वच्छता दूत पोलीस मित्र केशव साळुंके, पोलीस पाटील विठ्ठल झांजले यांनी योग्य प्रकारे काळजी घेतली होती .
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता . सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे, हवालदार माने उपस्थित होते .
दरवर्षी नदीकाठी मोठ्या प्रमाणात मूर्तींचा साठा होता याकरिता यावर्षी ग्रामपंचायतीने मत्स्यपालनासाठी असणाऱ्या छोट्या तराफा बोटी उपलब्ध करून यामार्फत या बोटींमधून नदीच्या पाण्यात खोलवर मूर्ती सोडण्याचे नियोजन केले होते.सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पर्यंत ८०० हून अधिक गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित झाल्या असे या गावचे बोटचालक शिवाजी बदक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नदीकिनारी जाणारा रस्ता अरुंद असल्याने काही ठिकाणी काहीशा प्रमाणात वाहतूक अडथळा निर्माण झाला होता.