भोर – भोर -पसुरे-पांगारी- कोंडगाव मार्गे साळुंगणला मुक्कामी असणारी MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी आठच्या सुमारास बसरापुर फाट्याजवळ बंद पडल्याची घटना घडली. एसटीतील सर्व प्रवासी दोन किलोमीटर पायी चालत भोरला गेले. त्यामुळे पुन्हा एकदा निकृष्ट दर्जाच्या एसटी बसचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे संतप्त प्रवासी नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
साळुंगण या ठिकाणी मुक्कामी असणारी भोर आगाराची MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी सहाच्या सुमारास शाळकरी विद्यार्थ्यांसह , प्रवासी नागरिकांना घेऊन भोर शहराकडे निघाली असता सदर एसटी बसरापूर फाट्याजवळ आली असता बंद पडली बस मध्ये पन्नास ते पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते .त्यामुळे एसटीतील जवळच भोर असल्याने दुसऱ्या एसटीची वाट न पाहता पायी चालत शहराकडे आले. संतप्त प्रवासी नागरिकांनी याबाबत एसटी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत एसटीची कायमच बोंब , निकृष्ट दर्जाच्या बंद पडक्या पत्रा सडलेल्या गळक्या गाड्या प्रशासन कधी बदलणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. चालक आणि वाहक यांनी तात्काळ आगारास कळवून एसटीचे दुरुस्ती विभागाचे कर्मचारी बोलावून दुरुस्तीचे काम सुरू केले इंजिन गरम झाल्याने एसटी बस बंद पडले असल्याचे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. सध्या एसटी बंद पडणे, एसटी गटारात जाणे, रस्त्यावरून घसरणे अशा घटना वारंवार होत असल्याने एसटी महामंडळ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.