जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मूठ बांधणी
भोर – भोर महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित पारठे व नांदगाव येथील महिला सरपंच भाग्यश्री च-हाटे यांनी आपल्यासह गावातील कार्यकत्यां समवेत व नाझरे गावातील बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद , पंचायत समिती या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश वाढले असून राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते सदर प्रवेश घेण्यात आला. यावेळी भोर, राजगड (वेल्हा), मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष घोरपडे , माजी उपसभाती विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे ,भोलावडेचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथील कार्यकर्त्यांनी रणजीत शिवतरे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन प्रवेश केला.
भोर तालुक्यातील नांदगाव गावातील सरपंच भाग्यश्री गणेश च-हाटे, दिलीप कुडले, प्रकाश कुडले, मोहन मांढरे, किसन कुडले, शंकर कुडले ,पंढरीनाथ च-हाटे, विजय च-हाटे, मारुती मारणे, दिनकर खोपडे, अरुण च-हाटे , शशिकांत खुटवड, अशोक भातुसे, बंटी च-हाटे, रावसाहेब च-हाटे , प्रशांत जगताप ,मिलिंद जगताप , संतोष कुडले, भरत कुडले , संभाजी कुडले, सुनील कुडले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला
कोंढरी गावचे सरपंच अजित पारठे आणि नाझरे गावातील बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यामुळे शिंद भोलावडे गटात राष्ट्रवादीला बळ मिळणार असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.