भोर पोलिसांची कारवाई आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी
भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोरला अवैद्यरीत्या गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला वाहनासह आज शुक्रवार (दि. १५) सकाळी ११ च्या सुमारास भोर पोलिसांनी भोर – महाड रस्त्यावरील रायरेश्वर डोंगरी विकास परिषद परिसरात MH-12 AF 0052 Maruti Suzuki Zen या कारमध्ये दारूच्या कॅन्डसह रंगेहात पकडले. विकास सुरेश रेपावत( वय ४० रा. कापूरव्होळ ता.भोर जि.पुणे)असे दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीचे नाव असून रेपावत यांस न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस नाईक दत्तात्रय खेंगरे यांनी भोर पोलिसात फिर्याद दिली आहे. शहरातील महाड नाका परिसरात एक जण दारूची वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलिसांनी सापळा रचून रेपावत यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० हजार ५०० रुपये किमतीची ३५ लिटरची तीन कॅन्ड भरून गावठी दारू ,५ मोकळे कॅन्ड, एक झेन मोटार हस्तगत केली आहे. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव ,दत्तात्रय खेंगरे, उद्धव गायकवाड , विकास लगस ,डी डी खांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक डी डी खांडे करीत आहेत.
कितीही अवैध कारवाया झाल्या, मुद्देमाल पकडला तरी हा मुद्देमाल मुख्यरीत्या येतो कोठुन ? बनतो कुठे ?यांचा मास्टर माईंड कोण? याचे उत्तर मात्र अजूनही मिळत नाही याची जनतेत चर्चा सुरू आहे.