भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
धुराळ्याचा होतोय नाक, तोंड ,घशासह,डोळ्यांना त्रास.
भोर : तालुक्याच्या ठिकाणी भोर शहरात ये जा करण्यासाठी जुना व नवीन असे दोन पूल आहेत या दोन्ही पुल रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून वाहन चालकांना यामधून मोठी कसरत करत जावे लागत असून नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी या पुलावरील खड्डे बुजवले होते परंतु संबंधित खड्डे बुजवताना हे चांगल्या प्रकारे बुजवले नसल्याने ,आता पाऊस उघडताच या पुलाच्या खड्ड्यांवरील माती ही मोठ्या प्रमाणात धुळीच्या स्वरूपात हवेमध्ये जात आहे. मोठी वाहने ये जा केल्यावर तर या खड्ड्यातील माती धुराळा होऊन मोठ्या प्रमाणात हवेत मिसळुन पाठीमागून येणाऱ्या दुचाकी,पायी चालणाऱ्या प्रवाशांना समोरचे काही दिसत नाही अशी परिस्थिती होत आहे, आणि हा उडालेला धुराळा प्रवासी धारकांच्या, वाहन चालकांच्या नाका तोंडाद्वारे शरीरात जात आहे यामधून लोकांना नाक तोंड घसा यांचे विकार होत आहेत. भोर शहरात जायचे झाले तर पुन्हा मास्क वापरले शिवाय पर्याय नाही असे प्रवासी नागरीक सांगत आहेत.
शिरवळकडे कामानिमित्त जाणारे,नवरात्र उत्सव सुरू असल्याने वाघजाई देवीकडे, मांढरदेवीकडे जाणारे मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत या सर्वांनाच या धुराळ्याचा मोठा त्रास होत आहे.संबंधित विभागाने या दोन्ही पुलावरील खड्डे हे चांगल्या प्रकारे बुजवावेत अशी मागणी शहरात ये जा करणा-या प्रवासी नागरिकांनी केली आहे.