भोर – सध्या सर्वत्र अपघाताचे प्रमाण वाढले असून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही अपघाताचा आलेख उंचावत चालला आहे . हेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व सुरक्षित वाहन कसे चालवावे, काय खबरदारी, दक्षता काळजी घ्यावी अशा सर्व वाहतूकीविषयी माहितीची जनजागृती भोरला भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर येथील परिवहन शिबीरात सोमवार (दि.८) करण्यात आली.
भोर येथे वाहन चालक परवाना शिबीरासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातुन व आजुबाजूच्या परिसरातून अनेक नागरिक उपस्थित झाले होते .संबंधित उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिप्ती करपे यांनी पुणे ग्रामीण मधील अपघात कमी करण्यासाठी प्रबोधन केले. तसेच पुणे RTO मधील मोटार वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर, संतोष गांगर्डे ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका गडेकर व सरला सूर्यवंशी अगदी सोप्या भाषेत रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम, हेल्मेट, सीटबेल्टची आवश्यकता का आहे , वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, वाहतूक व्यवस्था, पार्किंग , परवाना याबद्दलचे मार्गदर्शन केले, वाहतूकीचे नवीन नियम, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी या संदर्भात सर्व माहिती सांगितली आणि नंतर शेवटी रस्ता सुरक्षा अभियान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी भोर परिसरातील मोटार ड्रायविंग स्कूल मालक चालक व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.