भोर – येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत आयोजित भोर येथील उपजिल्हा मोफत आरोग्य शिबिरात विविध विभागाच्या ४८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले व उपजिल्हा रुग्णालय भोरचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. महेश गुडे यांच्या मार्गदर्शनाखालील या शिबिराचे उद्घाटन नगरपरिषदेचे माजी गटनेते यशवंत डाळ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद साबणे यांनी शिबीराचा मुख्य उद्देश महिला व बालके यांना दर्जेदार वैद्यकिय सेवा पुरवणे आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे हा असून पुढील काळात होणाऱ्या विविध शिबिरांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप शेटे, सोमनाथ ढवळे, अनुप धोत्रे, बाळासाहेब खुटवड, कुणाल धुमाळ, सोनल साळुंके , तेजस मोरे, डॉ. महेंद्र गवळी, डॉ. कांचन बाडेवाले, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य विलास मादगुडे, सुरेश कडू, नितीन सोनवले उपस्थित होते. असंमर्गीक आजाराच्या कार्यक्रमाअंतर्गत रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, आयुष्यमान भारत, आभा कार्ड इत्यादी सेवा देण्यात आल्या. गरोदर माता तपासणी १६, दंत चिकित्मा १७, कान नाक घसा ११, नेत्र चिकित्सा १५२ अस्थिरोग १०, त्वचा रोग २८, एक्स रे ९, बालरोग ५२ याशिवाय लसिकरण, मानसिक विकार, क्षयरोग, आयुष सेवा, शालेय आरोग्य आदी आजार ३०८ अशा एकूण ४८६ रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. यासाठी उपजिल्हा रुग्णालय भोर तसेच श्रीमती काशिबाई नवले वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व टिमचे योगदान लाभले.