भोर – येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीच्या ( नियामक मंडळ) सदस्यपदी वेळवंड खोऱ्यातील कर्नवडी (ता.भोर) येथील सुरेश दिनकरराव कडू यांची आमदार नामनिर्देशीत सदस्य म्हणून शुक्रवारी (दि.१२ ) नियुक्ती करण्यात आली.भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश गुडे यांच्या हस्ते शुक्रवारी भोर येथील रुग्णालयात कडू याना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी डॉ. संदीप चौधरी, डॉ.अनिकेत लोखंडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य विलास मादगुडे तसेच विष्णू बोडके उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे यांच्या मागणीनुसार आमदार मांडेकर यांच्याकडून कडू यांचे सदस्यपदीच्या नियुक्तीचे शिफारस पत्र देण्यात आले होते. रुग्णांच्या सोयीसुविधांसाठी ही रुग्णकल्याण समिती काम करते. जिल्हा रुग्णालय औंधचे जिल्हा शल्यचिकित्सक हे या समितीचे अध्यक्ष,भोरचे उपविभागीय अधिकारी उपाध्यक्ष तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिव असून तहसिलदार, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी, बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता हे शासकीय तर आमदार व सभापती नियुक्त प्रत्येकी एक असे या समितीचे सदस्य आहेत.